वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

याचिलागी वो त्यजियले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089786 · अभंग क्र. २०५

205.
याचिलागी वो त्यजियले भोग ।
याचिलागी वो केले नाना याग ।
याचिलागी वो अष्टांगादी योग ।
याचिलागी या विषयांचे त्याग वो ॥१॥
जन्माजन्मांतरी केली हे सूचना ।
याचिलागी वो वसविले निर्जना ।
भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना ।
याचिलागी केले तीर्थाटना वो ॥२॥
याचिलागी वो आसनी शयनी ।
केली निरंतर याचि चिंतवणी ।
बैसले धरुनिया रुप निज ध्यानी ।
नामी नेमियेली नित्य याचे वाणी वो ॥३॥
याचिलागी वो मंत्रजप केला ।
याचिलागी वो वेदात पाहिला ।
याचिलागी वो निजधर्म आनुष्ठिला ।
याचिलागी म्या संसार त्यजिला वो ॥४॥
याचिलागी हे नित्यज्ञान ।
केले सायास ते याचि वो लागून ।
याचिलागी नियमी निरोधिले मन वो ॥५॥
याचिलागी मी झालीये उदास ।
सांडूनि आपुलिया परिख्याची आस ।
याचिलागिं याचा निजध्यास ।
धरिला निळा म्हणे निशिदिनी ध्यास वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग