वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

येणे आपुलिया कुपेची

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089770 · अभंग क्र. २०६

206.
येणे आपुलिया कुपेची गुणे ।
माझी पोशिली वो सर्वांगजीवने ।
देऊनि क्षेम अवघी निवविली करणे ।
यासी काय देऊनि व्हावे म्या उत्तीर्ण वो ॥१॥
माझे जीवींचा हा जिवलग सोयरा ।
यासी करुनि काय पूजावे उपचारा ।
जे जे कीजे तो तो उपाधी पसारा ।
कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥
करुनि पूजू जव मंत्र तंत्र जप ।
जव हा शब्दातीत निर्गुण अरुप ।
कोण करु यासी न पवेचि वो तप ।
ध्यानी ध्याता हा अरुपी अरुप वो ॥३॥
यासि न पुरे वो जाणिवे जाणता ।
यासी न चले वो शहाणीव करिता ।
नाना तर्कवाद यापुढे वृथा ।
आता कोणा करु उपचार तत्वता वो ॥४॥
करिता योगाभ्यास न पवे ती सिध्दी ।
करिता नाना याग वाढती उपाधी ।
नित्यनित्यज्ञाने अभिमानाची वृध्दी ।
आता कोण्या युक्ति तोषवू कृपानिधी वो ॥५॥
ऐसे जे करु म्हणे आपुलिये मती ।
ते ते सांडी परते न धरी हा हाती ।
येकचि आवडे या शुध्द भाव भक्ती ।
निळा म्हणे वर्म दाविले हे संती वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग