मन मुरडुनी घातले मना
884.
मन मुरडुनी घातले मनाते ।
थोरू मारू तेथे होत असे ॥१॥
पुरे पुरे वो आता जिणे ते केउते ।
येणे वो पंढरिनाथे वेधियेले ॥२॥
नचले नचले काही करणे कामान ।
याचे पहाणेंची विंदान कामानिया ॥३॥
बापरखुमादेवीवरा विठ्ठलासी भेटी ।
संसारासी तुटी जाली गे माये ॥४॥
अर्थ :
मनाला संसारापासून मागे फिरवून परमात्मचिंतनांत ते मन घातले असता तेथे त्या मनाला थोर मार बसतो. म्हणजे मन स्वरूपाने राहातच नाही. अशी जर स्थिति आहे, तर या दुःखरूप संसारात जगून काय करावयाचे आहे. संसार पुरे झाला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल म्हणजेच पंढरीनाथाने माझ्या मनाला अगदी वेढून टाकले आहे की. ज्याच्या पहाण्याच्या बलवान इच्छेने संसारिक पदार्थाची इच्छा करणे असा मनाचा व्यापार चालतच नाही. असे माऊली सांगतात
