निळियेच्या निशी विरह
885.
निळियेच्या निशी विरहिणी पिशी ।
शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥
कृष्णसंगे वाली विव्हळ झाली निळी ।
चंदन अंगी पोळी विरहज्वरे ॥२॥
ज्ञानदेव प्रेम निळारूप रूपसे सोहळा ।
कृष्णवेधे वेधली माळा भली वसे ॥३॥
अर्थ :
नीलवर्ण परमात्म्याचा वियोग हीच कोणी रात्र अशा रात्रीच्या विरहाने वेडी झालेली स्त्री आपल्या बिछान्यांवर निजली तरी तिला गाढ झोप लागणे शक्य नाही. श्रीकृष्णाच्या संगतीचा विरह झाल्यामुळे विव्हळ होऊन ती ही निळी बनली. तिच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी श्रीकृष्णाच्या विरहामुळे तिला ती थंड न वाटता उलट उष्णच लागते. या नीलवर्ण परमात्म्याच्या प्रेमाची काय ही मौज आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा दर्शनाचा वेध लागून गोपी वेड्यां
होतात. माऊली ज्ञानदेव सांगतात.
