धन्य दिवस आजी दर्शन
172.
धन्य दिवस आजी दर्शन संतांचे । नांदे तया घरी दैवत पंढरीचे ॥१॥
धन्य पुण्यरुप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाही विचार ॥२॥
धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते । संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते ॥३॥
तुका म्हणे धन्य आम्हा जोडिली जोडी । संतांचे चरण आता जीवे न सोडी ॥४॥
