देवो ऐके हे विनंती ।
173.
देवो ऐके हे विनंती । मज नकोरे हे मुक्ति ।
तया इच्छा गति । हेचि सुख आगळॆ ॥१॥
या या वैष्णवांचे घरी । प्रेमसुख इच्छा करी ।
रिद्धिसिद्धि व्दारी । कर जोडुनी तुष्ठती ॥२॥
नको वैकुंठीचा वास । असे तया सुखा नाश ।
अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥३॥
तुका म्हणे आम्हा । जन्म गोड यासाठी ॥४॥
