करुनी कीर्तन मागती ज
1438.
करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । ते जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥
सर्व अलंकार शरीर शोभले । वायांपरी गेले कुंकुहीन ॥२॥
मावनानें भावे करावे कीर्तन । आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥
एका जनार्दनी कामनीक कीर्तन । करिता पतन जन्मोजन्मी ॥४॥
