वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुज ऐसा देव नाही तीन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075966 · अभंग क्र. ६६३

663.
तुज ऐसा देव नाही तीन्ही सृष्टी ।
तेहतीस कोटी देवांमाजी ॥१॥
भोळ्या भाविकाएसे दिससी भाविक ।
जैसा योगी बक जलामाजी ॥२॥
काय थोरपण जगा नागवण ।
काय हे भूषण तुज साजे ॥३॥
तुझे थोरपण तुजलाचि साजे ।
येरी अनबुजे होय देवा ॥४॥
बहिणी म्हणे बोंब तुझ्या करणीची ।
वृथा भूषणाची मनी कांक्षा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग