वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079607 · अभंग क्र. ३६१६

3616.
(निर्याणाचे अभंग)
येथीलिया अनुभवे । कळो जीवे हे येतसे ॥१॥
दोही ठायी एक जीव । माझी कीव त्या अंगी ॥धृपद॥
भूक भुकेचि खाउनि धाय । नाही हाय अन्नाची ॥२॥
तुका म्हणे सुख झाले । अंतर धाले त्यागुणे ॥३॥

अर्थ :
येथे मला जो अनुभव आलेला आहे त्यावरुन माझ्या जीवाला असे कळून येते की, विठोबा आणि माझा जीव एकच आहे विठोबाचे अंगी माझ्याविषयी त्यामुळेच तर कीव येते म्हणजे दया येते. भूकच भूकेला खाऊन तृप्त झाली आहे त्यामुळेच तर अन्नाविषयी आवडच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या दर्शनामुळे मला सुख झाले व माझे मन तृप्त झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग