(निर्याणाचे अभंग)
3615.
(निर्याणाचे अभंग)
आरोनिया पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियांस पुसे मात । तेथे चित्त लागले ॥धृपद॥
दळी कांडी लोकांऐसे । परि मी नसे ते ठायी ॥२॥
तुका म्हणे येथे पिसे । तेथे तैसे असेल ॥३॥
अर्थ :
मी आर्ततेने देवाची वाट पाहात आहे आता मला या भवसागरातील कटकट सोसवत नाही. कोणीही जरी आले तरी मी त्यांना एकच गोष्ट विचारतो की माझे माहेरचे काय चालले आहे कारण माझ्या माहेरचे विचारच माझ्या चित्तात आहे माहेरच्या ठिकाणीच माझे चित्त लागले आहे. मी लोकांच्यासारखे दळण कांडण करतो परंतू माझे चित्त तेथे गुंतून राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसे मला माझ्या माहेरच्या आईबापाचे वेड लागले आहे अगदी तसेच माझ्या माहेरी देखील माझ्या आई बापाला माझे वेड लागले असेल.
