आहा आहा रे भाई । हे
3956.
आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे सत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथी अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥१॥
यावे तेणे घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे ।
पात्र शुद्ध पाहिजे बरवे । मंगळभावे सकळ हर म्हणा रे ॥२॥
नव्हे हे काही मोकळे । साक्षी चौघांचिया वेगळे ।
नेदी नाचो मताचिया बळे । अणु अणोरणीया आगळे । महृदि महृदा साक्षित्वे हर म्हणा रे ॥३॥
हे हरी नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांति कल्पतरूची साउली । सकळा वर्णा सेविता भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरीदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदू शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शने ॥५॥
अर्थ :
अरे भाईंनो सन्मार्गाने जाणा-या सर्व यात्रेकरुंसाठी आम्ही अन्नदानाचे छत्र घातले आहे आणि त्यांची तहान भागवण्यासाठी हरीभजनाच्या पाणपोया सर्वत्र आम्ही घातल्या आहे. जे सन्मार्गाने चालले आहेत त्यांच्यासाठीच आम्ही मार्गाने त्यांचे इच्छाभोजन पूर्ण करण्यासाठी हे कार्य केले आहे. ज्याला वाटत असेल त्याने यावे आणि त्याने याचा लाभ घ्यावा, सदाशिवाने कधीही संपणार नाही असे केले आहे. परंतु घेणा-याचे पात्र हे शुध्द आणि चांगले पाहिजे त्यासाठी मंगलकारक भक्तिभावांने सर्वांनी हरहर असे म्हणा. हे नाम चार वेदांच्या साक्षीत्वाने असून त्यापासून ते वेगळे नाही. हे नाम कोणालाही आपआपल्या मताच्या बळाने नाचू देत नाही अणू रेणू यांच्या पोटात देखील ते साक्षीत्वाने आहे आणि महादाकाशमहतत्वाहून हे नाम श्रेष्ठ आहे त्यामुळे सर्वांनी हरहर असे म्हणा. संपूर्ण जगाचे पोट भरेल इतकी या हरीनामाची आंबिली केली आहे. हे
