वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आहा आहा रे भाई । तया

🙏 3. संत तुकाराम · ABH-079477 · अभंग क्र. ३९५७

3957.
आहा आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कली क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वाया बाहेरी ॥धृपद॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥२॥
विद्याबळे वाद करोनिया छळी । आणिकासि फळी मांडोनिया ॥३॥
गांविंचिया देवा नाही दंडवत । ब्राम्हण अतीत घडेचि ना ॥४॥
सर्वकाळ करि संताचिया निंदा । स्वप्नी ही गोविंदा आठवीना ॥५॥
खाचेमध्ये धन पोटासि बंधन । नेणे ऐसा दानधर्म काही ॥६॥
तुका म्हणे नटे दावुनिया सोंग । लवो नेदी अंग भक्तिभावे ॥७॥

अर्थ :
हे माझ्या भाईंनो कलियुगामध्ये जे कोणी क्रियाहीन, भ्रष्टहीन आहेत त्यांचा उध्दार करण्याची मी ब्रीदावळी केली आहे. त्या पापी लोकांच्या तोंडावर थुंका म्हणजे ते चांगल्या मार्गाला लागतील आणि जे स्वत:चेच वर्णन व्यर्थ करतात त्यांना बाहेर घालवून दयावे. जो मनुष्य नेहमी बायकोच्या आधीन असतो आणि आई वडिलांविषयी उदास असतो, त्याच्या दारात एखादा भिकारी भीक मागण्यासाठी दारात आला तर त्या भिका-याला तो भीक घालत नाही. एखादी विद्या ग्रहण करुन गर्वापोटी काहीतरी पैंज लावून दुस-यांचा तो छळ करत असतो. हे लोक गावातील देवताला कधी नमस्कार करीत नाही, ब्राम्हण अतिथींना तर कधीही नमस्कार, सत्कार करत नाहीत. ते सर्व काळ संतांची निंदा करतात त्यांना स्वप्नात देखील गोविंदाची आठवण त्यांना येत नाही. जमवलेले धन जमिनीत पुरुन ठेवतो. पैसे खर्च होतील यासाठी तो पोटाला अन्न खाण्यासही टाळाटाळ करतो आणि दानधर्म म्हणजे काय आहे हे देखील त्यांना माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक साधुसंतांचे स
1:16

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग