चित्त्ा ठेवूनि पाया
663.
चित्त्ा ठेवूनि पायावरी ।
रुप धरुनिया अंतरी ॥१॥
सुखे याच्या नामावळी ।
आठवीन नित्य काळी ॥२॥
करीन ऐसाची कैवाड ।
शंका येऊ नेदी आड ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
तुम्हा आठवीन श्रीपती ॥४॥
663.
चित्त्ा ठेवूनि पायावरी ।
रुप धरुनिया अंतरी ॥१॥
सुखे याच्या नामावळी ।
आठवीन नित्य काळी ॥२॥
करीन ऐसाची कैवाड ।
शंका येऊ नेदी आड ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
तुम्हा आठवीन श्रीपती ॥४॥