पापाचिया मुळे । झाले
3220.
पापाचिया मुळे । झाले सत्याचे वाटोळे ॥१॥
दोष झाले बळिवंत । नाही ऐसी झाली नीत ॥धृपद॥
मेघ पडो भीती । पिके सांडियेली क्षिती ॥२॥
तुका म्हणे काही । वेदा वीर्य शक्ति नाही ॥३॥
अर्थ :
पापामुळेच सत्याचे वाटोळे झाले आहे. अहो या कलीयुगामध्ये पाप अतिशय बलवान झाले आहे आणि त्यामुळे नीती राहिलीच नाही. अहो पाप कलीयुगामधे फारच वाढले त्यामुळे मेघ वर्षाव करण्यसाठी देखील भीत आहे पृथ्वीने तर धान्य पिकवणेच सोडून दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे अधर्म वाढत आहेत त्यामुळे वेदामंत्रामध्ये देखील काही सामर्थ्य शक्ती राहिली नाही.
