वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

परि आता माझी परिसावी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080589 · अभंग क्र. ३२१९

3219.
परि आता माझी परिसावी विनंती । रखुमाईच्यापती पांडुरंगा ॥१॥
चुकलिया बाळा न मारावे जीवे । हित ते करावे मायबापी ॥२॥
तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आता आहे लाज हेचि तुम्हा ॥३॥

अर्थ :
हे रुक्मीणीच्या पती पाडूरंगा माझी एक विनंती तुम्ही ऐकाच. आपले लेकरु लहान बाळ जर चुकले तर त्याला मायबापाने जीवेच मारु नये तर त्याचे हित होईल असेच त्यांनी करावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा लोक म्हणतात की, मी तुमचा आहे मग याचीच लाज तुम्हाला असू दयावी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग