विचारिले मनी भ्रतारे
22.
विचारिले मनी भ्रतारे आपण ।
आता हे त्यागून वना जावे ॥१॥
ईस नमस्कार करितील जन ।
आम्ही ईस तृण वाटो परी ॥२॥
स्त्रियेसी बोलती अनुवाद कथेचा ।
आम्ही परि नीच ईस वाटू ॥३॥
पुसतची येती ईस पहा जन ।
आम्ही की ब्राह्मण मूर्ख जालो ॥४॥
इचे नाव घेती गोसावीण ऐसे ।
आम्हा कोण पुसे इजपुढे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे भ्रतार मानसी ।
चितुनी चित्तासी बोध करी ॥६॥
