सांडूनि वैकुंठ । उभा
3990.
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥
आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥धृपद॥
पैल चंद्रभागे तिरी । कट धरूनिया करी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥
अर्थ :
वैकुंठाचा त्याग करुन पंढरीनाथ देव विटेवर नीट उभा आहे. जगजेठी पंढरीनाथ भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी येथे आला आहे. सर्वांपेक्षा निराळा असा हरी आपले कर कटेवर ठेवून उभा आहे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, आकाशामध्ये हरीनामाच्या गजराने जयजयकार होत आहे.
