कोटी सूर्य प्रभादीप्
1831.
कोटी सूर्य प्रभादीप्ती | गगनी झळकली अवचिती ॥१॥
संत नामयासी सांगती | पैल आला कमलापति ॥२॥
वच्छालागी जैसी धेनु | तैसा धांवे जगज्जीवनु ॥३॥
गरुडाचे पक्षवाति | दाही दिशा आक्रंदती ॥४॥
हरि कंठींची सुमनमाळ | सुटूनि आली भूमंडळ ॥५॥
सर्वे चाले सुदर्शन | भक्त करावया रक्षण ॥६॥
उचलोनि दोही बाही | नामा धरिला हृदयी ॥
