झणी दृष्टि लागो तुझ्
1832.
झणी दृष्टि लागो तुझ्या सगुणपणा | तेणे माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंता जन्मींचे विसरलो दुःख | पाहता तुझे मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी | तो तू आम्हांपाशी मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे जीवे करीन निंबलोण | विटेसहित चरण वोवाळीन ॥४॥
