भक्तप्रिये ये वो आई
589.
भक्तप्रिये ये वो आई ।
विठाबाई कृपाळे ॥१॥
न साहे वियोग प्राण फुटे ।
उदास वाटे तुजविण ॥२॥
कोणा जीवनभोजन मागो ।
कोणा सांगो जडभारी ॥३॥
निळा म्हणे धावोनि यावे ।
मज हे दयावे जीवदान ॥४॥
589.
भक्तप्रिये ये वो आई ।
विठाबाई कृपाळे ॥१॥
न साहे वियोग प्राण फुटे ।
उदास वाटे तुजविण ॥२॥
कोणा जीवनभोजन मागो ।
कोणा सांगो जडभारी ॥३॥
निळा म्हणे धावोनि यावे ।
मज हे दयावे जीवदान ॥४॥