ब्रम्हादिका न लभे तु
588.
ब्रम्हादिका न लभे तुमचे दर्शन ।
तेथे काय दीन अनाथ मी ॥१॥
रुसोनी इच्छितो भेटीचे गौरव ।
भक्तहीन भाव अपुरता ॥२॥
काजवे पाचारी जेवि दिनकरा ।
निज परंपरा नाठवुनी ॥३॥
निळा म्हणे तैसे अपराध हे माझे ।
न धरावे श्रीराजे मनावरी ॥४॥
