वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कल्पतरूपासी मागता कल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076091 · अभंग क्र. २२३

223.
कल्पतरूपासी मागता कल्पिले ।
सामर्थ्य ते भले तया अंगी ॥१॥
कासयासी शीण करिसी तू मने ।
क्रिया ते निर्वाण पाववील ॥२॥
चिंतामणीपासी मागता चिंतिले ।
भावना ते फळे सर्व तुझी ॥३॥
कामधेनूपासी होती पूर्ण काम ।
परिसी उत्तम होय काळे ॥४॥
अमृताचे पासी मागता अमरत्व ।
ज्ञानेचि पूर्णत्व पावसील ॥५॥
बहेणि म्हणे अंगी क्रिया ज्या समर्थ ।
सर्वही पदार्थ सिद्ध तेथे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग