वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

धन्य मानी मन विठ्ठला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076052 · अभंग क्र. २२४

224.
धन्य मानी मन विठ्ठलाचे जयाचे ।
चित्त निश्चयाचे स्वस्वरूपी ॥१॥
तयाचे संगती होय चित्तशुद्धि ।
अंतरी हा बोध प्रगट दिसे ॥२॥
निंदा आणि स्तुती जयासी समान ।
देही अभिमान नाही जया ॥३॥
बहेणि म्हणे जया नाही द्वैतभाव ।
तोचि जाणा ठाव आत्मयाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग