‘ वैद्याचा देह’ व्या
222.
‘ वैद्याचा देह’ व्यापियेला रोगे ।
मात्रा मागे, त्यागे, मूर्ख तोची ॥१॥
यालागी पारखी करोनिया जाण ।
होईल कल्याण सर्व तुझे ॥२॥
आपणचि बुडे कासे लावी जना ।
तयाच्या वचना मूर्ख मानी ॥३॥
धरीच उपवासी आमंत्री लोक ।
सत्य मानी एक तोही मूर्ख ॥४॥
बहेणि म्हणे अंगी जयासी सामर्थ्य ।
सर्वही पदार्थ सिद्ध तेथे ॥५॥
