वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मनाची वासना मनेंचि न

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090075 · अभंग क्र. १९६

196.
मनाची वासना मनेंचि नेमावी । सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥१॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल । विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥२॥
साधिता मार्ग गुढ वासना अवघड । गुरुमार्गी सुघड उपरती ॥३॥
निवृत्ति वासना उपरति नयना । चराचर खुणा हरि नांदे ॥४॥

अर्थ:
मनातील वाईट इच्छा मनातच संपवुन सर्वत्र भरुन असलेल्या विठ्ठलाला मनात धरले की मन वासनारहित होते. हे सर्व करायला सोपे आहे फक्त विठ्ठलाचे स्मरण केले की वासना आपोआप निमतील व विठ्ठल मनात आपोआप स्थापित होईल काही गुढ इच्छा परमार्थ करताना त्रास देतात पण गुरुमार्गी वैराग्य साधना केली की त्या निघुन जातात. निवृत्तिनाथ म्हणतात, माझ्या डोळ्यांना तर चराचरात व्यापक असलेला हरि पाहायची वासना लागली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग