वेधल्या गोपिका सकळ ।
15.
वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवे दुजे मनी कांही । कृष्णावांचुनीं आन नाही । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥ करिता संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधे वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥ एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाही विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥
