गणिकेच्या काय देखिले
662.
गणिकेच्या काय देखिले अधिकारा ।
निजपायी थारा दिला तिशी ॥१॥
जन्मजन्मांतरीचा अजामेळ पापी ।
तयासी स्वरूपी मेळविले ॥२॥
चांडाळ पातकी वाल्ह्या कोळी चोरा ।
यशाचा डांगोरा केला त्याच्या ॥३॥
गजेंद्रे आकांती काय केला धावा ।
तेथे तू केशवा धावलासी ॥४॥
बहिणी म्हणे तुझ्या जरी आले मना ।
पहाई न गुणा तया दोषा ॥५॥
