असे नांदतु हा हरी सर
3380.
असे नांदतु हा हरी सर्वजीवी । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवी ।
घटी बिंबले बिंब हे ठायिठायी । तया संगती नासु हा त्यासि नाही ॥१॥
तृन वाटिता क्षीर हे होत नाही । पशू भिक्षता पालटे ते चि देही ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजि काये ।
धीर नाही त्ये वाउगे धीग झाले । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥
असे नाम हे दर्पणे सिद्ध केले । असे बिंब ते या मळा आहे ठेले ।
कसे शुद्ध नाही दिसे माजिरूप । नका वाढवू सीण हा पुण्यपाप ॥४॥
करा वर्म ठावे नका सोंग वाया । तुका वीनवीतो पडो काय पाया ।
त्यज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरले शेवटी काय पाहे ॥५॥
अर्थ :
हा हरी सर्व जीवांमध्ये व्यापलेला आहे जसा लाकडामध्ये अग्नी अदृश्य रुपाने आहे अगदी तसाच. चार पाच घट ठेवले आणि त्यामध्ये पाणी टाकले व पाहिले तर सर्व घटामधे सूर्याचे प्रतिबिंब दिसेल आणि जरी एखादया घटातील पाणी संपले तरी सूर्याचे प्रतिबिंब संपले असे नाही तर सूर्याच्या प्रतिबिंबाचा नाश होत नाही अगदी त्याप्रमाणे जरी देहाचा नाश झाला तरी आत्मरुप हरीचा नाश होत नाही. जसे पाहा की, गवत जर आपण वाटले तर त्याचे दूध काही होणार नाही परंतू तेच गवत व्यालेल्या गाईने खाल्ले तर त्या गवताचे रुपातर मात्र दुधात होते. याचे वर्म जाणणारा एकच आहे आणि तोच सर्वांच्या आतरबाह्य व्यापून आहे. केळीच्या झाडाला शेवटी केळीचे फळ येते परंतू त्याच्या पोकळीमध्ये केळीचा शोध घेण्यास गेलो तर आपल्याला काय भेटणार आहे ? परंतू ज्यांना झाडाला फळ आणि फूल येईपर्यं
