ऋषि ह्मणती धर्मदेवा
152.
ऋषि ह्मणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद घ्यावा ॥1॥
पांडवपालक गोविंद । तिही लोकी गाजे ब्रिद ॥2॥
भक्तिभावे केला वश्य । हरि सांभाळी तयास ॥3॥
रात्रंदिवस तुह्मांपासी । दुजा ठाव नाही त्यासी ॥4॥
देव द्रौपदीते सांभाळी । उभा पाठीसी वनमाळी ॥5॥
वनी सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशी ॥6॥
हरिभक्तिं जाहला ऋणी । म्हणे नामयाची जनी ॥7॥
