अर्थ जे काढिती उपनिष
151.
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनिया गोड भाजी घेती माठ ॥1॥
भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥2॥
पुंडलिके धन जोडिले असता । प्रार्थोनिया देता न घेती हे ॥3॥
मग गडी हो पाहे देवचि येथोनी । जवळी होती जनी फावले तिये ॥4॥
