कोणे संबोधीले तुम्हा
671.
कोणे संबोधीले तुम्हा ।
पतीतपावन नारायणा ॥१॥
पावनास्तव आले येथ ।
न करिसी सत्य जाते घरी ॥२॥
कोणे बांधिला सादर ।
पायी ब्रीदाचा तोडर ॥३॥
तुज ऐसा त्रिभुवनी ।
कृपण नाही चक्रपाणी ॥४॥
बहिणी म्हणे खळा केला ।
बोध, कोणा कामा आला ॥५॥
