अक्रुरास हस्तीनापुरी
208.
अक्रुरास हस्तीनापुरी जाण्याची आज्ञा
अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषले मन फार त्याचे ॥१॥
घालेनि आसन प्रक्षाळी चरण । ह्मणे धन्य दीन आजीचा हा ॥२॥
जोडिनिया हात घाली नमस्कार । जाहला उद्धार पूर्वजांचा ॥३॥
हस्तनापुरासि अक्रूरा त्वा जावे । सांगितले देवे नामा ह्मणे ॥४॥
