वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

तैचि ज्ञानियासी होईज

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074442 · अभंग क्र. ४७५

475.
तैचि ज्ञानियासी होईजेल मोक्ष ।
ज्ञानेश्वर लक्ष लक्षितसे ॥१॥
पहाण्याशी मूळ विचारुनि पहा ।
मग सुखी रहा निरंजनी ॥२॥
इवलुसा प्रपंच परी तो बद्ध की ।
सज्ञानी विवेकी न शिवती ॥३॥
पयाचिये कुंभी पडे बिंदुविष ।
चतुर तयास न घेपती ॥४॥
षड्रस पक्वाने वाढिली खापरी ।
श्वान शिवे श्रोत्री स्पर्शीतीना ॥५॥
घालुनिया कडे शून्याशी बांधिता ।
त्याचिया गणिता न करवे ॥६॥
सर्वही उपाधि त्यागुनि आकार ।
राहे ज्ञानेश्वर निजरूपी ॥७॥

अर्थ :
जेव्हा लक्षावर लक्ष असेल तेव्हांच ज्ञानाने ज्ञानीपुरुषास मोक्षप्राप्ती होईल, तद्वत माऊलीचे लक्ष ध्येयापाशी आहे. ज्या मूळ गोष्टीकडे पहावयाचे त्याच गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष द्या. म्हणजे निर्लेप जे ब्रह्मस्वरुप त्याचे सुख अनुभवाल. प्रपंच अल्पसा वाटतो, पण तोच बंधाला कारण आहे. म्हणून जाणते व विचारी पुरुष त्यापासून दूर राहातात. दूधांत विषाचा थेंब पडला तर चतुर पुरुष ते दुध घेत नाही. तसेच षड्रस पक्वात्र खापरांत वाढले व त्याला कुत्र्याने स्पर्श केला तर याज्ञिक त्याला स्पर्श करीत नाही. शून्याची कल्पना यावी म्हणून 'O'आकार दाखवितात म्हणून तेवढ्यावरुन शून्याचे माप करता येईल काय? सर्व आकार व उपाधिचा बाध करुन आम्ही आत्मस्वरुपच झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग