तेचि ब्रह्मरूप जाणिज
476.
तेचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ ।
शद्ध ते निर्मळ मनाहुनी ॥१॥
स्थूळ दृष्टी करुनि जयासी लक्षिता ।
तत्त्वता भास काही ॥२॥
सहज निवृत्तिदास तो उदास ।
अनुभव सौरस सांगितला ॥३॥
अर्थ :
जे ब्रह्म स्थूल दृष्टीने पाहिले तर दिसत नाही जे मनाहून अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. तेच ब्रह्मस्वरुप होय. आम्ही ही अनुभवाची गोडी तुम्हांला सहज सांगितली. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.
