वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

स्वामीसी तो पुरे एक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087977 · अभंग क्र. २१४३

2143.
स्वामीसी तो पुरे एक भाव गांठी । वाउगा श्रम नेहटी वाया जाय ॥१॥
भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारी ॥२॥
अर्जुनाचे रथी सारथीं होउनी । राहे मोक्षदानी भावासाठीं ॥३॥
विदुराचे घरी आवडीने भक्षी । कण्या साक्षेंपेसी खाती देव ॥४॥
पोहे सुदाम्याचे खाउनी तुष्टला । एका जनार्दनी दिला सुवर्णगांव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग