करा हरिभक्ती संतांचे
3394.
करा हरिभक्ती संतांचे पूजन । व्रत एकादशी रात्रो जागरण । वासुदेव नामाचे मुखी उच्चारण । तेणे न होय बंधन यमाचें ॥१॥
रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव॥ध्रुव॥
नित्य वाचे नामावळी । वदे वदे सर्व काळी । पातकांची होळी । क्षणमात्रें होईल ॥२॥
जनांसी तारक वासुदेव नाम । आणीक नको साधन वायांचि नेम ।
गावें तू सुखें जनी जनार्दन । एकाभावे वंदी एका जनार्दन ॥३॥
