पहा कैसा देवाचा नवला
3236.
पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥
पहाणें परतले देवे नवल केले । सर्वही व्यापिले काय पाहो ॥२॥
पाहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देही दाटला देव माझ्या ॥३॥
एका जनार्दनी कैसे नवल जाहले । दिशाद्रुम दाटले देहे सहजीं ॥४॥
