धन्य त्यांची तया माय
1411.
धन्य त्यांची तया माय प्रसवली ।
ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपी ॥१॥
विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी ।
विठ्ठल शयनी न विसंबती ॥२॥
त्यांचे सर्व काम पूर्ण मनोरथ ।
करिल हा नाथ पंढरिचा ॥३॥
निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंगी ।
रंगले ते जगी धन्य जाले ॥४॥
