दळणी दळीता आठवे मानस
1410.
दळणी दळीता आठवे मानसी ।
अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥
वोविया मंगळी गाईन तयासी ।
स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥
एकाजनार्दन आणि नामदेव ।
देति स्वानुभव आठविता ॥३॥
परलोकसोईरे जिवलग हे माझो ।
जे का पंढरिराजे अनुग्रहीले ॥४॥
निळा म्हणे संत जे जे भूमंडळी ।
त्यांची पायधुळी वंदीन मी ॥५॥
