वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

बैसोनी कळंबातळी । गड

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084747 · अभंग क्र. २३४

234.
बैसोनी कळंबातळी । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥
नानापरीचीं पक्कान्ने । वाढिताती उत्तम गुणें । सर्वा परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥
वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करी ॥३॥
लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरी । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीया ॥४॥
एका जनार्दनी म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्ही घ्यावा आधी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग