वैकुठींचा हरी गोपवेष
233.
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वना ॥१॥
धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥
बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥
दही भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥
श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविले एका जनार्दनी ॥५॥
