वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तुजविण सत्ता । नाही

🙏 3. संत तुकाराम · ABH-080649 · अभंग क्र. ३३८५

3385.
तुजविण सत्ता । नाही वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणो दास । म्हणोनि जालो उदास ॥धृपद॥
तुम्ही दिला धीर । तेणे मन झाले स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलो मी हे तुझे कोड ॥३॥

अर्थ :
देवा माझ्यावर तुझी सत्ता आहे आणि माझ्या वाणीला तुझ्यावाचून बोलविणारा दुसरा कोण आहे माझेच काय संपूर्ण त्रैलोक्यावर तुझीच सत्ता आहे. देवा आम्ही दासांनी हे जाणून घेतले आहे त्यामुळे तर देहावर उदास झालो आहे. देवा तुम्हीच मला धीर दिला त्यामुळे तर माझे मन स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा प्रत्येक प्रसंगी मी तुला पुढे घालून तुझ्या आड लपून राहिलो ही देखील तुझीच लीला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग