वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नोहे दास खरा । परि ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080499 · अभंग क्र. ३३८४

3384.
नोहे दास खरा । परि हा झाला से डांगोरा ॥१॥
यासी काय करू आता । तू हे सकळ जाणता ॥धृपद॥
नाही पुण्यगाठी । जे हे वेचू कोणासाठी ॥२॥
तुका म्हणे का उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥

अर्थ :
हे देवा मी तुझा खरा दास नाही परंतू माझा तसा डांगोरा सर्वत्र झाला आहे. याला मी आता काय करु तू तर सर्व जाणता आहेस. माझ्या वाट्यातील पुण्य खर्च करुन एखादयासाठी चांगले कार्य करावे असे मी ठरवले तर तेवढे देखील पुण्य माझ्या पदरामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचा खरा दास नाही खरा भक्त नाही परंतू मी तुमचा खरा भक्त आहे खरा दास आहे अशी सर्वत्र माझी प्रसिध्दी झाली आहे एवढी माझी प्रसिध्दी करुन विनाकारण माझी उपाधी तुम्ही का वाढविली आहे ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग