गोपाळ सवंगडे आले वाड
22.
गोपाळ सवंगडे आले वाडेकोडे । असंख्य बागडे हरिरुपी ॥१॥
बिंबली पंढरी हरिरुप सार । अवघाची श्रृंगार विठ्ठलराजु ॥२॥
कालया कौशल्य नामदेव जाणे । तेथीलीहे खुणे निवृतिराजु ॥३॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नरहरि वेगा झेलिताती ॥४॥
वैकुंठ सावळे माजी भक्त मेळे । काला एक्या काळे करिताती ॥५॥
निवृत्ति संरुर्णता घेऊनी उध्दारु । सेविता उदार हरिराणा ॥६॥
अर्थ:
श्रीकृष्ण अवतारामुळे त्याचे भक्त त्याच्या प्रेमामुळे गोपवेष घेऊन त्याच्या भोवती अवतरले आहेत. सगळे अलंकार लेऊन हाच परमात्मा पंढरीत विठ्ठल स्वरुपात अवतिरण झाला आहे व पंढरी त्याच्या सार रुपात रंगली. ह्याच्या प्रेमभक्तीने रंगलेले नामदेव, निवृत्तिनाथ त्याची खुण ओळखतात. ह्याने उधळलेला एकात्म काला ज्ञानदेव, सोपान जममित्र नागा, नरहरी सोनारांदी संत वरच्यावर झेलतात. मध्याहच्या वेळेवर एकाच वेळी एका ठिकाणी हा एकात्म काला सावळा रंग घेतलेले परब्रह्म भक्तांच्या मेळ्यात वाटत असते. निवृतिनाथ म्हणतात आम्ही केलेल्या नामरुप प्रेमभक्ती मुळे तो परमात्मा संतुष्ट झाला व त्यांने कृपा करुन माझा संपुर्ण उध्दार केला.
