वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

नाही यासि गोत नाही य

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089976 · अभंग क्र. २१

21.
नाही यासि गोत नाही यासी कुळ । शेखी आचारशीळ कोण म्हणे ॥१॥
बाळरुपे हरि गोकुळी लोणी चोरी । त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥२॥
सोवळा हरि वागवी शिदोरी । तो गोपालांच्या करी काला देतु ॥३॥
निवृत्ति संपुर्ण काला देतु जाण । ब्रह्मसनातन गोकुळीचे ॥४॥

अर्थ:
एको ह ह्या वेदवाक्यानुसार हे परमतत्व एकटे आहे त्यामुळे त्यास कुळ व नाती नाहीत. तो अकर्तुम असल्याने तो कर्म करतो असे कसे म्हणता येईल. हा परमात्मा गोकुळात एकीकडे लोणी चोरत असताना दुसरीकडे पान्हा अनावर झाल्यामुळे यशोदा त्यास स्तनपानासाठी बोलवत असे. पण सत्वगुणी सोज्वळ शिदोरी ही हा परमात्मा बाळगतो व त्यातील काला गोपाळांच्या हाती खायला देतो. निवृत्तीनाथ म्हणतात गोकुळीच्या ह्या ब्रह्मसनातनाने आपला स्वस्वरुप काला गोपाळांना वाटला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग