वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079583 · अभंग क्र. ३६२४

3624.
(निर्याणाचे अभंग)
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुह्मी ॥१॥
कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥धृपद॥
वाढवूनि दिलो एकाचिये हाती । सकळ निश्चिंती झाली तेथे ॥२॥
आता मज जाणे प्राणेश्वरासवे । माझिया भावे अनुसरलो ॥३॥
वाढविता लोभ होईल उसीर । अवघीच स्थिर करा ठायी ॥४॥
धर्म अर्थ काम झाला एके ठायी । मेळविला जिंही हातो हात ॥५॥
तुका म्हणे तुम्हाआम्हा हेचि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥

अर्थ :
मी चाललो आहे त्यामुळे मला वैकुंठीला जाण्यासाठी तुम्ही मला निरोप दया आणि तुम्ही तुमच्या घरी जावे. कोणतेही कर्म करताना व धर्म करताना आपल्या वर्णाश्रमाप्रमाणेच तुम्ही करावे व त्यानेच तुमचे कल्याण होईल हेच माझे आशिर्वाद तुम्ही घ्यावे. आतापर्यंत तुम्ही मला वाढविले आणि देवाच्या हाती देऊन टाकले त्यामुळे माझी सर्व प्रकारे निश्चिंती झाली आहे. आता मला माझ्या प्राणेश्वराबरोबर जावा लागेल मी माझ्या भक्तीभावानेच त्याला अनुसरलेलो आहे. तुम्ही जर माझ्याविषयी लोभ म्हणजे प्रेम वाढविले तर मला जाण्यास उशीर होईल त्यामुळे तुम्ही लोभ प्रेम सर्व विकार येथे स्थिर म्हणजे अगदी शांत करा. ज्यांनी या जन्मामध्ये हातोहात धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करुन घेतले आहेत ते धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो आता तुमची आणि माझी ही शेवटची भेट असेल माझ्या मागे त्या गोष्टी केवळ बोलण्यासाठीच उरलेले असतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग