निर्गुण सगुण नव्हे त
339.
निर्गुण सगुण नव्हे ते समान | तेसे तेंहि जाण योगाभ्यासी ॥१॥
प्रल्हादासी हरि शंख चक्र गदा | सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारासी | सखा उद्ववासी साक्ष दावी ॥३॥
नामा म्हणे माझा केशिराज भोळा |दाविसी गोपाळा बाललीला ॥४॥
