वैकुंठी पाहे तव चतुर
338.
वैकुंठी पाहे तव चतुर्भुज दिसे |परि सुंदर रुप तेथे नाही ॥१॥
क्षीरसागरी पाहे तो तेथे निद्रस्त |परि सुंदर रुप तेथे नाही ॥२॥
द्वारके पाहे तव पाताळी चरण |परि सुंदर रुप तेथे नाही ॥३॥
ह्रॄदयी तव अव्यक्तची दिसे |परि सुंदर रुप तेथे नाही ॥४॥
नामा म्हणे ऐका सर्व गुण संपूर्ण |पंढरिये उभा शोभतसे ॥५॥
