चारी वेद गाती जयासी
529.
चारी वेद गाती जयासी अखंड | नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥
तोचि भीमातीरी उभा दिगंबर | ठेवी कटी कर भक्तांसाठी ॥२॥
युद्धी अर्जुनाते सांगितली गीता | सहस्त्रशा कांता केल्या ज्याने ॥३॥
नामा म्हणे शिवा दिल्हे शिवपण | ब्रह्मया लागोन उपदेश ॥४॥
