नेणवेची बाळ की हे मृ
3636.
नेणवेची बाळ की हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥
मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥
रक्त मांस तेणे जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥
एका जनार्दनी उदक आणुनी कांता । पाहे तंव तत्वता बाळ न दिसे ॥४॥
